क्रेडाई अध्यक्ष युवराज हुलजी यांची ग्वाही : कार्यकारिणीची निवड
बेळगाव : बांधकामाचे दर वाढल्याने सर्वच शहरांमध्ये इमारतींच्या किमती वाढत आहेत. परंतु बेळगाव शहरात सर्वसामान्यांना परवडतील असे गृहप्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊ. बांधकाम व्यावसायिकांना अनेक अडचणी येत असतात. त्या दूर करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन क्रेडाई बेळगावचे नूतन अध्यक्ष युवराज हुलजी यांनी दिले. क्रेडाई बेळगावची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष म्हणून हुलजी यांनी आपली भूमिका मांडली. व्यासपीठावर क्रेडाईचे राज्याध्यक्ष प्रदीप रायकर, माजी अध्यक्ष चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतगेकर, क्वैस नुराणी, राजेंद्र हेडा, आनंद कुलकर्णी, गोपाळ कुकडोळकर यासह इतर उपस्थित होते.
माजी अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी सर्वांचे आभार मानत यापुढेही एकत्रित काम करण्याची ग्वाही दिली. प्रदीप रायकर यांनी भविष्यातील घरांची मागणी व बांधकाम व्यावसायिकांना संधी या विषयावर माहिती दिली. पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्षपदी युवराज हुलजी, सचिव प्रशांत वांडकर, खजिनदार सुधीर पानारे, सहसचिव सचिन कळ्ळीमनी, गोपाळ कुकडोळकर, संचालकपदी सलिम शेख, राजेश माळी, सचिन बैलवाड, वीरेश शट्टण्णावर, डी. एन. सायनेकर यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतगेकर, क्वैस नुराणी, राजेंद्र हेडा, तांत्रिक सल्लागारपदी आनंद कुलकर्णी, पी. एस. हिरेमठ, कायदा सल्लागार गोपाळ कुकडोळकर यांची निवड करण्यात आली. महिला विंगच्या शहर समन्वयिकापदी करुणा हिरेमठ, सचिव सविता सायनेकर यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड झाली.









