शिवशक्ती युवा संघटनेच्या वतीने आयोजन
वार्ताहर/किणये
बिजगर्णी येथील शिवशक्ती युवा संघटना यांच्या वतीने मोटरसायकल सोबत म्हैस पळविण्याची शर्यत मोठ्या उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर हे होते. शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले, ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, उपाध्यक्ष नामदेव मोरे, ग्रा.पं. सदस्य मनोहर बेळगावकर आदींच्या हस्ते दीपप्रजनन करण्यात आले. मोटरसायकल सोबत म्हैस पळवण्याच्या शर्यतीमध्ये ग्रामीण भागातील व शहर भागातील म्हैस मालकांनी सहभाग घेतला होता. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही शर्यत लहान व मोठा गट अशा दोन विभागात घेण्यात आली. बक्षीस वितरण मोहन मोरेंसह मान्यवरांचे हस्ते झाले.









