प्रतिनिधी /बेळगाव
विद्युत भारीत तारेचा स्पर्श होऊन शॉक लागल्याने बामणवाडी रस्त्या लगत असणाऱया शेतामध्ये एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही म्हस कुट्टलवाडी येथील बाळु नाईक या शेतकऱयाची असून चरावयासाठी ती मोकळी सोडण्यात आली होती. मात्र रस्त्यालगत असलेल्या ट्रॉन्स्फॉर्मरच्या तारा तुटून खाली पडल्या होत्या. ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. म्हशीचा पाय त्यावर पडला आणि तीचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









