के. रत्नाकर शेट्टी फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्टस फौंडेशन आयोजित राहुल के. रत्नाकर शेट्टी बाद पध्दतीच्या फुटबॉल स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बुफाने रेग एफसीचा, फास्ट फारवर्डने रेग एफसीचा तर सावकार निपाणीने खानापूर युनायटेडचा पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. करण माने, कौनेन व सुफियान यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. स्पोटींग प्लॅनेट लव्हडेलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात बुफा संघाने रेग एफसी ब संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला बुफाच्या अयान शेखच्या पासवर सुफियान सय्यदने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 29 व्या मिनिटाला निवृत्ती पवनोजीच्या पासवर आयान शेखने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 45 व्या मिनिटाला सुफियानच्या पासवर निवृत्ती पवनोजीने तिसरा गोल केला. तर 57 व्या मिनिटाला निवृत्ती पवनोजीच्या पासवर सुफियानने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात फास्ट फारवर्डने रेग एफसी ब चा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर कौनेन होसमनीने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 49 व्या मिनिटाला कौनेनच्या पासवर नदीम माकनदारने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 51 व्या मिनिटाला रेग एफसीच्या सौरभने 1-2 अशी आघाडी कमी केली. 57 व्या मिनिटाला कौनेने बचावफळीला चुकवत तिसरा गोल करून 3-1 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात सावकार एफसी निपाणीने खानापूर युनायटेडचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 28 व्या मिनिटाला शुभमच्या पासवर करण मानेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 48 व्या मिनिटाला करण मानेच्या पासवर शुभमने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात खानापूर युनायटेडला गोल करण्यात अपयश आले. मंगळवारी उपांत्यफेरीचे सामने बुफा वि. सावकार निपाणी यांच्यात सायं. 5 वा. तर फास्ट फारवर्ड वि. तेलंगाणा यांच्यात सायं. 6.30 वा. खेळविण्यात येणार आहे.









