गोल्डन बुट, नजिब इनामदार उत्कृष्ट खेळाडू, अमिन खजिर, स्पर्धेतील सर्वाधिक गोल नदिम मकानदार
बेळगाव : रत्नाकर के. शेट्टी स्पोर्टस फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुफा एफसी संघाने कॉसमॅक्स एफसीचा टायब्रेकरमध्ये 6-4 असा पराभव केला. राहुल के. आर. शेट्टी चषक पटकाविला. फास्ट फॉरवर्ड संघाला तिसऱ्या क्रमांकाला समाधान मानावे लागले. स्पर्धावीर म्हणून निजम इनामदार, सामनावीर म्हणून अमीन खाजीर, सर्वाधीक गोल निजम मकानदार यांना चषक देऊन गौरविण्यात आले. लव्हडेल स्कूलच्या स्पोटींग प्लॅनेट मैदानावरती खेळविलेल्या अंतिम सामन्याचे उद्घाटन उत्तरचे आमदार राजु सेठ, अमन सेठ, अश्पाक गोरी, अजमन मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते कॉसमॅक्स व बुफा संघांच्या खेळाडूंची ओळख करून करण्यात आली. या सामन्यात पहिल्या निमिटापासून जोरदार चढाया सुरू केल्या.
11 व्या मिनिटाला बुफाच्या नजिब इनामदारच्या पासवर अमिल बेपारीने सुरेख गोल करून 1-0 ची आघाडी बुफाने मिळविली. 23 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या अमिनने मारलेला फटका बुफाचा गोलरक्षक सोहम ओऊळकरने उत्कृष्ट अडविला. पहिल्या सत्रात कॉसमॅक्सने 1-0 ची आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला अमिन खाजीरच्या पासवर हमाजाने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 61 व्या मिनिटाला बुफाच्या निवृत्ती पवनोजीच्या पासवर सुफियन सय्यदने गोल करून 2-1 ची आघाडी मिळविली. 68 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या अमिनने जोरदार फटका गोलपोस्टकडे मारला होता. हा चेंडू गोलरक्षकाला निटसा अडविता न आल्याने चेंडू हाताला लागून बाहेर जात असताना प्रज्वलने त्याचा फायदा उठवित गोल करून 2-2 अशी बरोबरी करीत रंगीत निर्माण केली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचे गोलफलक समान राहिल्याने पंच इम्रान बेपारीने टाय ब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये बुफाने 6-4 असा पराभव केला. बुफातर्फे सय्यद अतार, निजब इनामदार, अभिषेक चेरेकर, अंजला पठाण यांनी गोल केले. तर कॉसमॅक्सतर्फे हार्मोनने गोल केला तर अमिन हजीर व प्रज्वल यांनी चेंडू बाहेर मारला.
तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविलेल्या सामन्यात फास्ट फॉरवर्डने साईराजचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या शोएबच्या पासवर नजिम इनामदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघानी गोलसाठी प्रयत्न केले. बक्षिस वितरण प्रसंगी आ. राजु सेठ, अमन सेठ, बसवराज रायगुड, डॉ. उमेश अचार्य, आजमान मोमीन, इम्रान फतेखान, सिध्दू मेत्री, अब्दुल गफुर, रियाज किल्लेदार, राहुल मगदूम, शंकर कांबळे, पुनित शेट्टी, प्रणय शेट्टी, प्रसन्ना शेट्टी यांच्या हस्ते विजेत्या बुफा व उपविजेत्या कॉसमॅक्स संघांना फिरता चषक व कायमस्वरूपी चषक, तिसऱ्या क्रमांक पटकाविलेल्या फास्ट फॉरवर्ड व चौथा क्रमांक पटकाविलेला साईराज यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उगवता खेळाडू प्रज्वल लाड, कृष्ण मुचंडी, उत्कृष्ट डिफेंडर अतिक, उत्कृष्ट गोलरक्षक स्वयम ओऊळकर, उत्कृष्ट मिडफिल्डर कैस, उत्कृष्ट संघ सिटी स्पोर्टस, गोल्डन शुज व उत्कृष्ट फॉरवर्ड, निजब इनामदार स्पर्धावीर, अमिन खजिर, अंतिम सामन्यातील सामनावीर रोहन व स्पर्धेतील सर्वाधिक गोल निदम मकानदार, अबुजर बिस्ती यांना चषक देऊन गौरविले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून इम्रान बेपारी, विष्णू धामणेकर, मंथन गावकर, उमेश यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी के. आर. शेट्टी, स्पोर्टस फौंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. फिजिओ रूक्सार वाटंगी व अतुल म्हणून यांनी काम पाहिले.









