आमदार नाईकांनी घडवला फसवून प्रवेश ; बुधवले सरपंचांची स्पष्टोक्ती
बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी सोमवारी रात्री माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. मात्र मंगळवारी सकाळी आपल्याला फसवून आमदार नाईक यांच्याकडे नेण्यात आले आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असे दाखवले. मात्र आपण ग्रामस्थ यांच्या पाठींब्याने भाजप पक्षात प्रवेश केला. गावचा विकास भाजप करू शकतो. त्यामुळे आपण भापापातच आहोत. असे सरपंच संतोष पानवलकर यांनी मंगळवारी सायंकाळी भाजप मालवण कार्यालय येथे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत भानुदास येरम, अनिल येरम, उल्केश येरम, प्रकाश पाताडे, विश्वास हिरलेकर, गुरूदास घाडी तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, राजन गांवकर, महेश मांजरेकर, मंगेश गांवकर, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.









