4 उपाध्यक्षांची नेमणूक
वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबमधील आम आदमी पक्षाला नवा प्रमुख मिळाला आहे. पक्षाने बुधराम यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. तर अन्य काही नेत्यांना नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आप प्रदेश उपाध्यक्षपदी अमनशेर सिंह सैरी कलसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जसवीर सिंह राजा गिल, जगदीप सिंह काका बराड, तरुणप्रीत सिंह यांनाही प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रदेश सरचिटणीस म्हणून जगरुप सिंह सेखवां यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दविंदरजीत सिंह लाडी यांना राज्य युवा शाखा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाकडून 11 जून रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात आयोजित सभेनंतर करण्यात आलेल्या या फेरबदलाला लोकसभा निवडणुकीशी जोडून पाहिले जात आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मागील काही काळापासून केंद्रातील भाजप सरकार विरोधात वातावरण निर्मिती करू पाहत आहेत. अशा स्थितीत पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळू शकेल अशी अपेक्षा आम आदमी पक्षाला वाटतेय.









