Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2023-24 अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला . या अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांची घोषणा करण्यात आली. मोदी सरकारने आज २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.हा अर्थसंकल्प येत्या काळात देशाची स्थिती आणि दिशा ठरवणार असल्याचे चित्र आहे. बजेट सादर झाल्यानंतर अवध्या काही मिनिटातच शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी खूप मोठा आहे. अदाणींच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर मार्केटमध्येही अस्थिरता दिसून आली होती.मात्र अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारातही तेजी दिसून आली.
अर्थ संकल्पामुळे बाजारात झालेल्या तेजीने गुंतवणूकादारांच्या अपेक्षा वाढल्या आहे. सध्या बाजारात 41 शेअर्समध्ये तेजी तर 9 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तर शेअर बाजारात सेन्सेक्स 1010 अंकाच्या तेजीसह 60,560 वर व्यवहार करत आहे तर निफ्टी 256 अंकाच्या तेजीसह 17,918 वर व्यव्हार करत आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीचा छापा
Next Article काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर









