जुन्या आणि नव्या करप्रणालीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यानुसार, नवीन करप्रणाली नागरिकांना लागू करण्यात आली असून, जुनी करप्रणाली स्वीकारण्याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध असणार आहे.अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार नव्या करप्रणालीनुसार ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तर स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांना ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तब्बल नऊ वर्षानंतर इन्कम टॅक्स स्लॅब (आयकर रचना) बदलण्यात आला आहे.नवीन स्लॅब कसा असणार आहे याच्याविषयी जाणून घेऊया.
असे असतील नव्या कररचनेतील टप्पे
० ते ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न – कोणताही कर नाही
३ ते ६ लाखांपर्यंतचं उत्पन्न – ५ टक्के कर
६ ते ९ लाखांपर्यंतचं उत्पन्न – १० टक्के कर
९ ते १२ लाखांपर्यंतचं उत्रन्न – १५ टक्के कर
१२ ते १५ लाखांपर्यंतचं उत्पन्न – २० टक्के
१५ लाखांहून जास्त उत्पन्न – ३० टक्के
नवीन करप्रणाली
२०२० मध्ये केंद्र सरकारने अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना कराच्या बोजापासून सुटका होण्यासाठी अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीची घोषणा केली होती. त्यासाठी या कररचनेमध्ये अनेक स्लॅब्जही जाहीर करण्यात आले होते. मात्र, या करप्रणालीला करदात्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
जुन्या करप्रणाली
जुन्या करप्रणालीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकींचे पुरावे सादर करून करदाते त्यांच्या कराची रक्कम कमी करू शकतात. यामध्ये गुंतवणूक, घराचं भाडं, एलटीए, कलम ८० क अंतर्गत नमूद असणारी करामधली सूट यांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









