ऑनलाईन टीम
जगावर कोरोना महामारीचे संकट असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ६४१८० कोटींची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आरोग्य क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. पुढील सहा वर्षात आरोग्य सेवेचा टप्याटप्यात दर्जा सुधारला जाणार आहे. कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे. या योजनेत ग्रामीण भारतात १७००० आणि शहरी आणि निमशहरी भागात ११००० नवीन आरोग्य सेवा केंद्र उभारली जाणार आहेत.
तसेच आरोग्य सेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. तर, देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. देशात सध्या दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसीना मान्यता मिळाली आहे. लवकरच आणखी दोन लशी तयार होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.











