ऑनलाईन टीम
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आरोग्य सेवा सुविधा, कृषी, उद्योग, सहकारी बँका आदी. क्षेत्रासाठी मोठ्या निधीची घोषणा देखील केली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारने रेल्वे बजेट देखील याच अर्थसंकल्पात मांडण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वेचा अर्थसंकल्प आता आपल्याला वेगळा पाहयला मिळणार नाही.
यंदाच्या या बजेटमध्ये अर्थमंत्री सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१० लाख कोटींची तरतूद जाहीर केली आहे. यापैकी रेल्वेच्या विकासासाठी १.०७ लाख कोटी देण्यात आले आहेत. यात नॅशनल रेल्वे प्लॅननुसार २०३० पर्यंत विकास केला जाणार आहे. गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ७०२५० कोटींची घोषणा करण्यात आली होती.










