बौद्ध महासभा बेळगाव शाखेतर्फे आवाहन
बेळगाव : मागासवर्गीय आयोगाने राज्यात 22 सप्टेंबरपासून जातनिहाय सर्वेक्षण चालविले आहे. त्यामुळे बौद्ध धर्मीयांनी धर्म बौद्ध, जात कॉलममध्ये अनुसूचित जाती असे लिहावे, असे आवाहन भारतीय बैद्ध महासभेचे अध्यक्ष एस. एस. कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्य सरकारकडून जातनिहाय जनगणनेला सुऊवात केली आहे. त्यानुसार बौद्ध धर्मीयांचीदेखील गणना केली जाणार आहे. सरकारकडे बौद्ध निगम स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात 4 लाख बौद्ध धर्मीय आहेत. पण, यावेळी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात बौद्ध धर्मीयांनी व्यवस्थित माहिती भरावी, धर्माच्या कॉलमपुढे बौद्ध, जातीच्या पुढे अनुसूचित जाती असे लिहावे. जातनिहाय सर्वेक्षण सुरू करण्याआधी बौद्ध धर्माचा उल्लेख केल्याबद्दल कोकाटे यांनी सरकारचे स्वागत केले. यावेळी एस. आर. कोकाटे, वाय. पी. गडीनाईक, एम. डी. कांबळे आदी उपस्थित होते.









