Buddhacharya Certificate and Sanad distribution ceremony of Sindhudurg Buddhist Welfare Federation in excitement
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई) चा बौद्धाचार्य प्रमाणपत्र व सनद वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभागातील एकूण २० बौद्धाचार्याना धम्माबाबत विशेष मार्गदर्शन करून त्यांना मान्यवरांच्याहस्ते बौद्धाचार्य प्रमाणपत्र व सनदीचे वितरण करण्यात आले.सावंतवाडीत श्रीराम वाचन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर
अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई) केंद्रीय कार्यकारणीचे मानद ट्रस्टी गोपाळ जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ बौद्धाचार्य तथा संस्कार समिती बौद्धजन पंचायत समिती (मुंबई) चे संतोष तांबे, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचे उपाध्यक्ष सुरेश जाधव, मुंबई बौद्धजन पंचायत समितीचे मनोहर तांबे, महासंघाचे मुंबई केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस बी एस कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संतोष तांबे यांनी नूतन बौद्धाचार्य यांना बौद्ध धम्माबाबत बहुमोल मार्गदर्शन करताना बौद्ध धम्माच्या विधी केव्हा व कशा करायच्या याची माहिती सांगून या जगात बौद्ध धम्म कसा श्रेष्ठ आहे? त्याची तत्त्वप्रणाली काय? संस्कार कसे आत्मसात करावे? बौद्धाचार्य म्हणून आपली कर्तव्य काय? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मनोहर मोरे यांनी माणूस म्हणून कसे जगले पाहिजे याची माहिती बौद्धाचार्याना करून दिली.
या कार्यक्रमाला महासंघाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव टिळाजी जाधव, शिवाजी जाधव, अमित जाधव, सुमेध जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शंकर ऊसपकर, तसेच महेश परुळेकर आदी उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी