उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी जुलैअखेर मुदत : लवकरच एका कंपनीला काम
बेळगाव : बेळगाव नगरविकास प्राधिकारण (बुडा)ने नवा मास्टरप्लॅन (सीडीपी) पुढील वर्षापर्यंत तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या 28 गावांचा समावेश असणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. कोणतीही नोटीस न बजावता बुडाच्या कार्यक्षेत्रात शहराशेजारील 28 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या समावेशाला संबंधित ग्रामस्थांनी विरोध केला आहे. असे असले तरी बुडाने निविदा प्रक्रियेसाठी ठेका देण्याची तयारी केली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
जुलैपर्यंत मास्टरप्लॅन पूर्ण करणार
मास्टरप्लॅन तयार करण्याचे उद्दिष्ट जुलै अखेरपर्यंत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. जुलै अखेरपर्यंत मास्टरप्लॅन पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र या कालावधीत हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आता मास्टरप्लॅनसाठी अतिरिक्त ताण वाढणार आहे. त्यामुळे बुडा कशा पद्धतीने नवा मास्टरप्लॅन तयार करणार याकडे लक्ष लागले आहे.
शहराबरोबरच नवीन 28 गावांचा समावेश असणार
नव्या मास्टरप्लॅनसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. शहराबरोबरच नवीन 28 गावांचादेखील यामध्ये समावेश असणार आहे. लवकरच एका कंपनीला हे काम दिले जाणार आहे.
-शकिल अहम्मद-बुडा आयुक्त









