वृत्तसंस्था / हॅले
एटीपी टूरवरील येथे झालेल्या हॅले खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत कझाकस्थानच्या अॅलेक्झांडर बुबलीकने एकेरीचे जेतेपद मिळविताना रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेव्हचा पराभव केला.
एटीपी टूरवरील स्पर्धेतील बुबलीकचे हे पहिले विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात बुबलीकने मेदव्हेदेव्हचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. यापूर्वी बुबलीक आणि मेदव्हेदेव्ह यांच्यात सहावेळा सामने खेळविले गेले होते आणि ते सर्व सामने बुबलीकने गमविले होते. मेदव्हेदेव्हवरील बुबलीकचा हा पहिला विजय आहे. या जेतेपदामुळे एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत बुबलीकचे स्थान निश्चितच वधारणार असून तो 30 व्या स्थानावर राहील.









