मध्यप्रदेशच्या बैतूल मतदारसंघातील निवडणूक टळली
वृत्तसंस्था/ बैतूल
मध्यप्रदेशच्या बैतूल मतदारसंघातील बसपचे उमेदवार अशोक भलावी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी निवडणूक आयोगाला यासंबंधी माहिती दिली आहे. बसप उमेदवाराच्या निधनानंतर बैतूल मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया आता नव्याने होणार आहे. या मतदारसंघात बसपकडून नवा उमेदवार जाहीर करण्यात आल्यावर प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी दिली आहे. निवडणूक आयोगच तेथील नामांकन आणि मतदानासाठी नव्या तारखांची घोषणा करणार आहे. बैतूलमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मतदान होणार होते.









