तासाभरापासून जिल्ह्यातील नेटवर्क गूल
सिंधुदुर्ग जिल्हयात गेल्या तासाभरापासून बीएसएनएल सेवा ठप्प झाली आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नेटवर्क गुल झाले आहे .मिळालेल्या माहितीनुसार फायबर केबल कट झाली आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . भल्यासकाळीच सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांची कामे नेटवर्क अभावी खोळंबली आहेत .









