सीएमडीने सांगितल्या भविष्यामधील योजना : विविध राज्यांमध्ये कामांना प्रारंभ
मुंबई :
दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये जवळपास 3,500 बेस ट्रान्सीव्हर स्टेशन स्थापन करण्यात आले आहेत. मध्यप्रदेश, तामिळनाडूसह अन्य राज्यांमध्ये टॉवर उभारणीचे काम सुरु असल्याची माहिती सीएमडी प्रवीण कुमार पुरवार यांनी यावेळी दिली आहे.
एका इंडस्ट्रीजच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पुरवार म्हणाले, की टेल्कोला शक्य तितक्या लवकर व्यावसायिक अशी 4 जी सेवा सुरु करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 20,000 बीटीएस स्थापन करण्यात आल्यानंतर हे सुरु केले जाऊ शकते असे सूचित केले आहे.
उत्तर भारतीय राज्यांव्यतिरिक्त, टेल्कोने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची निवड केली आहे जिथे 4जी सेवा सुरू केल्या जातील. एप्रिलनंतर तामिळनाडूमध्ये 4जी सेवा सुरू होऊ शकते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलगू भाषिक राज्यांमध्ये 4,200 ठिकाणी 4जी टॉवर बसवण्याचे काम सध्या सुरू आहे.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने 4जी सेवा सुरू केल्याच्या वर्षांनंतर बीएसएनएलने 4 जी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. पुन्हा पुन्हा उशीर झाला. त्यामुळे परिणामी, बीएसएनलचे ग्राहक घटले गेले.
#