शिलाँग : मेघालयाच्या ईस्ट खासी जिल्ह्dयात जमावाने बीएसएफच्या चौकीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून बीएसएफने अनेक तस्करांना पकडले आहे. याचमुळे नाराज होत गावातील लोकांनी चौकीवर हल्ला केल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले. बीएसएफ चौकीवरील हल्ल्याची घटना शिलाँगपासून 100 किलोमीटर अंतरावरील उमसिएम गावात घडली आहे. येथे रविवारी रात्री उशिरा जमावाने बीएसएफ चौकीवर दगडफेक केली, यात दोन जवान जखमी झाले आहेत. तर बीएसएफच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत तीन जण जखमी झाले आहेत. बीएसएफकडून बांगलादेशच्या दिशेने होत असलेली तस्करी रोखली आहे. तसेच अनेक तस्करांची ओळख पटविली आहे. याचमुळे हा हल्ला झाला असल्याची माहिती बीएसएफच्या मेघालय फ्रंटियरचे महासंचालक प्रदीप कुमार यांनी दिली आहे.
Previous Articleपेन्शन निवडीच्या मुदतीत 11 जुलैपर्यंत वाढ
Next Article ‘आदीपुरुष निर्मात्याला न्यायिक चपकार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









