वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील बालाकोट सेक्टरमधील नियंत्रण रेषेच्या पुढील भागातून एक बीएसएफ जवान बेपत्ता झाला. बीएसएफने परिसरात शोधमोहीम सुरू केल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत या जवानाचा कुठेच थांगपत्ता लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव अमित अशोक पासवान असे असून तो बीएसएफच्या 79 व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे.
बालाकोट सेक्टरच्या फॉरवर्ड भागात तैनात असलेला बीएसएफ कॉन्स्टेबल अमित पासवान ड्युटीवर जात असताना बेपत्ता झाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रात्री बालाकोट पोलीस चौकीत कॉन्स्टेबल अमित पासवान बेपत्ता झाल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.









