चंदीगड / वृत्तसंस्था
चंदीगड महापालिकेतील महापौरपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 29 जणांनी मतदान केले. यापैकी भाजप उमेदवाराला 15 तर ‘आप’ला 14 मते मिळाली. क्रॉस वोटिंग न झाल्याने या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. महापौर पदाबरोबरच आम आदमी पक्षाला उपमहापौर पदही मिळू शकले नाही. येथे भाजपचे अनुप गुप्ता नवे महापौर झाले आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या जसबीर लड्डी यांचा अवघ्या 1 मताने पराभव केला. काँग्रेस आणि अकाली दलाचे नगरसेवक मतदानाला अनुपस्थित राहिले. शिरोमणी अकाली दलाचे नगरसेवक हरदीप सिंग यांनी मतदान केले नाही. 2015 पासून काँग्रेसचा कोणीही महापौर होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर 2016 पासून सातत्याने भाजपचा महापौर होत आहे. उपमहापौरपदही भाजपने पटकावले आहे.









