के. रत्नाकर शेट्टी चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्टस क्लब आयोजित के. रत्नाकर शेट्टी चषक आतंरक्लब क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून तेजल शिरगुप्पी हुबळीने अर्जुन स्पोर्ट्सचा, हुबळी क्रिकेट अकादमीने चम्पियन नेटचा, बेळगाव स्पोर्टसने निनाचा तर चॅम्पियन नेटने लक्ष क्रिकेट अकादमी निपाणीचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. तनिष्क जैन, चिराग मेनशीनकाई, केदारनाथ कुलकर्णी, संकेत शेट्टी यांना सामानावीर पुरस्कार देण्यात आला. जिमखाना मैदानावरती सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात निना स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडीबाद 92 धावा केल्या. त्यात मुकूंद भिंगेने 22, एमडी बिलालने 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टसतर्फे तनिष्क जैनने 16 धावात 3, सुरेंद्र पाटील व सोमेश रूद्रास्वामी यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्टस क्लबने 15.5 षटकात 1 गडीबाद 94 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात निल पवारने 34, आशुतोष हिरेमठने 30, सुरेंद्र पाटीलने 26 धावा केल्या. निनातर्फे मदन चडीचालने 1 गडीबाद केला.
दुसऱ्या सामन्यात चॅम्पियन्सनेटने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा केल्या. त्यात चिराग मेनशीनकाईने 76, मुस्तफा गोकाकने 47, प्रितम जोशीने 32 धावा केल्या. निपाणीतर्फे राजवीर व प्रणेशने प्रत्येकी 2 गडीबाद केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष क्रिकेट अकादमी निपाणीचा डाव 20 षटकात 108 धावात आटोपला. त्यात समर्थ कटांबळेने 42, जकीम पटेलने 11 धावा केल्या. नेटतर्फे हित पटेल, सुप्रेश कार्ले यांनी प्रत्येकी 3 गडीबाद केल्या. तिसऱ्या सामन्यात अर्जुन स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 13.2 षटकात सर्व गडीबाद 64 धावा केल्या. त्यात कृष्णा सुतारने 26 धावा केल्या. तेजस हलापुरने 10 धावात 3, कर्दन व वैभव यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना तेजल शिरगुप्पीने 7 षटकात बिनबाद 68 धावा करून सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात प्रितम चिमनगीने नाबाद 31, आदीत्य धानण्णावरने नाबाद 23 धावा केल्या. चौथ्या सामन्यात चॅम्पियननेटने प्रथम फलंदाजी करताना 18.5 षटकात सर्व गडीबाद 66 धावा केल्या. त्यात चिराग मेनशीनकाईने 20 तर प्रितम जोशीने 14 धावा केल्या. हुबळीतर्फे संकेत शेट्टी व अक्षय यांनी प्रत्येकी 3 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमीने 8.3 षटकात 1 गडीबाद 67 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला.









