जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील सुसलाद येथे किरकोळ कारणावरून पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली ललिता कलाप्पा कांबळे (वय वर्ष 25) असे मयत पत्नीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सुसलाद येथील आंबेडकर नगरमध्ये कलाप्पा कांबळे आपल्या पत्नी व मुलासह राहतात. कल्लाप्पा यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन आल्यानंतर त्याचा नेहमी पत्नीशी वाद होत होता. मंगळवारी रात्री दारू पिऊन घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दारूच्या नशेत कल्लाप्पाने याने पत्नीच्या डोक्यात दगड घातला. यात ललीता हीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर याबाबतची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली. उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला कलाप्पा कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.