सांगली :
सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंड मुबारक उर्फ फुलबा हसीउल्ला सहा (वय ३७, रा. प्रकाशनगर, कुपवाड) याच्या खून प्रकरणी तीन संशयिताना अटक केली आहे. अद्याप दोघे पसार असून त्याशिवाय आणखीन एका अल्पवयीनचा यामध्ये समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांनी पूर्वीच्या भांडणातून खून केल्याचे कबुली दिली. अटक केलेल्यामध्ये तुषार संजय झिंजरुटे वय २४ वर्षे रा. भागोदय सोसायटी चैतन्यनगर पेट्रोल पंपाजवळ सांगली, श्रीकांत दुर्योधन ढगे वय २१ वर्षे रा. अयोध्यानगर सटाले मळा सांगली, तन्वीर हरुन जमादार वय २३ वर्षे रा. चैतन्यनगर दडगे प्लॉट नंबर ०१ संजयनगर सांगली यांचा समावेश आहे.
तर संजय गडद, अमन नगारजी आणि एक अल्पवयीन बालक पसार आहे. ही कारवाई संजय नगर पोलिसांनी केली. मुबारक सहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो प्रकाशनगर परिसरात राहण्यास असून भंगार व्यवसायिक आहे. सोमवारी दुपारी सह्याद्रीनगर येथील हॉटेल रत्नामध्ये आले होते. त्याच्यासोबत मित्रही अजरुद्दीन इनामदार हा देखील होता. त्यावेळी संशयितही त्याठिकाणी आले. संशयित आणि मुबारक यांच्यात किरकोळ वादातून बाद झाला. त्यातून एका संशयिताने धारधार हत्याराने हल्ला केला. आरडाओरडा करत मुबारक तेथून पश्चिमेला पळत सुटला. त्यावेळी एका प्रार्थनास्थळासमोर दुचाकीवरून गाठले. संशयितांनी त्याला दगडाने ठेचले. ही सारी घटना नागरिकांनी पाहिली. त्यानंतर संशयितांनी दुचाकीवरून पळ काढला.
दरम्यान, भागातील नागरिकांनीच १०८ रूग्णवाहिकेस बोलावले. परंतु मुबारकच्या डोक्यात गंभीर धाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत मुबारकच्या भावाची फिर्याद घेतली होती. त्यानंतर सीसीटीव्ही पहिला असता त्यांना मृत मुबारक यास मारहाण करतानाचा व्हिडिओ दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी तपास करून तिघाना अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बिमला एम, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, सहा.पो.नि. किरण स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली, अंमलदार कपील सांळुखे संतोष पुजारी, दिपक गायकवाड, असिफ सनदी, शरद बंजारी, अशोक लोहार, सुरज सदामते, अनिकेत शेटे, ऋषिकेश खोचगे, हनमंत कांबळे, सुशांत लोंढे व सुरज मुजावर यांनी पार पाडली.
- मुबारक रेकॉर्ड वरील गुन्हेगार
मृत मुबारक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कुख्यात गुंडाच्या टोळीत त्याचा सहभाग होता. हाच काटा काढण्यासाठी दुसऱ्या गुंडांच्या टोळीने हल्ला केल्याची चर्चा परिसरात होती. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. त्यानुसार या संशयितची चौकशी सुरु आहे.








