कसब बावडा येथील घटना
अनैतिक संबंधातून भरदिवसा महिलेचा चाकूने गळ्यावर वर करून निर्घृण खून करण्यात आला. कविता प्रमोद जाधव ( रा. कसबा बावडा, लाईन बाजार) असे तिचे नाव आहे. घटनास्थळी शाहूपुरी पोलीस पोहोचले असून पंचनामा सुरू आहे. घटनास्थळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. संशयोत आरोपी राकेश संकपाळ याला काही तासात पोलीसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे.
आरोपी राकेश शामराव संकपाळ हा शहाजी नगर कसबा बावडा कोल्हापूर येथे राहत असून तो सुतार काम करतो. श्रीमती कविता प्रमोद जाधव वय 34 रा. कसबा तारळे, ता. राधानगरी ही त्याच्या नात्यातील आहे. कविता जाधव हिचे पती गेले चार वर्षापूर्वी मयत झाले आहेत. तेव्हा पासून ती शिवणकाम व इतर रोजगार करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. आरोपी राकेश संकपाळ याने कविताचे पती मयूर झाल्यापासून तिच्या घरी येणे-जाणे होते. आरोपी संकपाळ याने आपल्याशी लग्न करण्याकरता कविताच्या मागे लागला होता. पण ती लग्न करण्यास तयार नव्हती. आज संकपाळ याचे आई वडील बाहेर गेले असता त्याने मयत कविता हिला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर आरोपीने मयत हिला लग्नाबाबत तगादा लावला परंतु मयत कविता जाधव हिला तीन मुले असल्याने लग्न करण्यास नकार दिला. त्याचाच राग आल्याने आरोपी यांनी आपले राहत्या घरातील कोयत्याने कविता तिच्या गळ्यावर सपासप वार करून तिला ठार मारले.आरोपीने कविताला मारल्याची कबुली दिली आहे. आरोपी संकपाळ याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
.