जयसिंगपूर प्रतिनिधी
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्म नगर इचलकरंजी फाट्यावर तृतीयपंथीचा दगडाने ठेचून निर्घृण खुन झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी तीन वाढण्याच्या सुमारास उघडकीस आली सुमारास उघडकीस आली मृत तृतीयपंथी हा खोतवाडी शिंदे मळा परिसरात राहत असून त्याचे नाव महेश उर्फ संतोष रामदास जावीर वय वर्ष 30 असे आहे वर्चस्व वादातून सदरची घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती समजताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करुन जयसिंगपूर पोलीसांनी मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे घटनेची नोद करण्याचे काम जयसिंगपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.