इम्रान खान यांच्या सभेदरम्यान घडली घटना
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्sय ईशनिंदेच्या आरोपानंतर जमावाने एका इसमाची क्रूरपणे हत्या केली आहे. ही घटना मर्दान जिल्ह्यात शनिवारी इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या सभेदरम्यान घडली आहे. 40 वर्षीय मौलाना निगर आलम यांनी सभेत कथितपणे एक वादग्रस्त तुलना केली होती. सभेदरम्यान उग्र जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता, परंतु जमावावर नियंत्रण मिळविणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जमाव मौलाना निगर आलमला काठ्या, दगडांनी मारताना दिसून येत आहे. आलम यांच्या मृत्यूनंर जमाव त्यांचा मृतदेह खेचत नेताना दिसून येतो.
पाकिस्तानात यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जमावाने एका आरोपीला पोलीस स्थानकातून बाहेर काढत ठार केले होते. ही घटना पंजाब प्रांताच्या ननकाना साहिब जिल्ह्यात घडली होती. पोलीस स्थानकावर हल्ला होताच पोलिसांनी पळ काढला होता.









