रवींद्र पाटील या तरुण शेतकऱ्याचा भात शेतीमध्ये नवीन प्रयोग
सांगरूळ प्रतिनिधी
म्हारुळ (ता. करवीर) येथील रवींद्र रंगराव पाटील या तरुण शेतकऱ्यांने भात शेतीमध्ये नवीन प्रयोग घेत ब्राऊन राईस व ब्लॅक राईस जातीचे भात पीक घेतले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भाताचा हा वाण आहे. शुगरच्या रुग्णांना उपयुक्त असे ही भाताची जात आहे . या वाणाच्या भाताच्या उपयुक्ततेमुळे जुनं ते सोनं अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, व अधिकारी, शेतकरी यांनी भात प्लॉटवर भेट दिली.यावेळी बोलताना शेतकरी रवींद्र पाटील म्हणाले कणेरी मठावर सेंद्रिय शेती व पिकांचे देशी वाण संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातून प्रेरणा जुनं वाण टिकवण्यासाठी या भाताची आम्ही निवड केली. यामध्ये ब्राऊन राईस अर्धा एकर, ब्लॅक राईस अर्धा एकर क्षेत्रावर चोपणीने जूनमध्ये पेरणी केली पेरणी केली. आज भारताची उंची सुमारे साडेपाच फूट आली असून या भातामधून ८० टक्के प्रोटीन शरीराला मिळतात. शुगरच्या रुग्णांना उपयुक्त असे हे भात आहे.प्रत्येकी अर्धा एकरात पंधरा पोथी भाताचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी रंगराव पाटील म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळातील भाताचा वाण आहे. पूर्वी कसदार धान्य होते. यामुळे नागरिक ही कसदार होते. आता कमी दिवसाचे भात असून माणसाचे आयुष्य पण कमी होत आहे.अभिजीत पाटील म्हणाले शेतामध्ये रासायनिक खताचे प्रमाण वाढले आहे. तसेच माणसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. यासाठी पिकांचे देशी वाण टिकवले पाहिजे . देशी वाणांचा आरोग्याला उपयोग होईल. असे प्रयोग आम्ही शेतात करत आहोत.
यावेळी तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार म्हणाले करवीर तालुक्यामध्ये पंधरा हजार एकर भाताचे क्षेत्र असून म्हारुळ मध्ये एक एकर मध्ये हा नवीन प्रयोग केला आहे. या भाताची न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे .या पिकाचे संशोधन सुरू असून वाण विकसित करण्याचे काम सुरू आहे. यावेळी शेतकरी बाजीराव पाटील ,मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र माने ,कृषी पर्यवेक्षक सुनील रेपे, कृषी सहायक प्रियांका पाटील ,एम जी पाटील ,अमृत मडके, आनंद शिंदे ,अमित पाटील,अभिजीत पाटील, भगवान पाटील ,माधुरी पाटील, शिवानी पाटील ,दिशा चव्हाण हे उपस्थित होते.









