चिपळूण,प्रतिनिधी
Ratnagir Crime News : कोळकेवाडी-तांबडवाडीमध्ये पौढा खून झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी भावाने मोबाईल घेतल्याच्या रागातून दुसऱ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी सख्ख्या भावासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 24 तासात या घटना उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
संजय विनायक सुर्वे ( वय- 39, कोळकेवाडी-तांबडवाडी) या सख्ख्या भावासह वसंत रामा हिलम ( वय- 40 कोळकेवाडी-हासरेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर रवींद्र विनायक सुर्वे (वय-42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री रवींद सुर्वे यांनी घरात मटण असल्याचे सांगून शेजाऱ्यांकडून दोन भाकऱ्या आणल्या होत्या. त्यानंतर गुरूवारी सकाळी ते उपड्यास्थितीत मृत दिसून आले होते.त्यांच्या शेजारी मोबाईल व दारूची बाटली दिसून आली होती. यातूनच अज्ञाताने हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.या खुनाचा तपास करत असतानाच पोलिसांनी रवींद्र यांचा सख्खा भाऊ संजय सुर्वे तसेच वसंत हिलम या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.यातूनच बुधवारी रात्री रवींद्र सुर्वे व संजय सुर्वे या दोन भावांमध्ये मोबाईल घेतल्याच्या कारणावरुन वाद होताच संजयने रवींद्र यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केल्याची कबुली दिली.या प्रकरणी संजय व वसंत यांना शुक्रवारी न्यायालयात आणले असता संजय याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी तर वसंत हिलम याला न्यायालयीन कोठडी प्राप्त झाली आहे.
दरम्यान, मृत रवींद्र सुर्वे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत.ते गावात राहून आपला उदरनिर्वाह करत असत.शिवाय त्यांना दारुचे व्यसन होते.









