सोनिपत : सद्यकाळात मुलांना फास्ट फूडच अधिक आवडत असते. अनेकदा लहान मुले फास्ट फुडसाठी हट्ट करत असतात. परंतु हे फास्टफूड कधीकधी घातकही ठरू शकते. हरियाणाच्या सोनिपत येथे नूडल्स खाल्ल्यावर तीन मुलांची प्रकृती बिघडली होती. यानंतर या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान यातील दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. भूपेंद्र नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी बुधवारी रात्री नूडल्स खाल्ले होते, ज्यानंतर ते सर्वजण झोपी गेले होते, परंतु रात्री सुमारे एक वाजता घरातील तीन मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे दोन मुलांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 वर्षीय हेमा आणि 5 वर्षीय तरुण याचा समावेश आहे. मुलांच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांच्या आईची प्रकृती बिघडली आहे. तर 8 वर्षीय प्रवेशवर अद्याप उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करत मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. कुटुंबीयांनुसार नूडल्स नजीकच्या एका दुकानातून खरेदी करण्यात आले होते.
Previous Article8 अमेरिकेतील उत्पादनांवरील सीमाशुल्क हटविले
Next Article अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची प्रकृती बिघडली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









