वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची महिला नेमबाज शबीरा हॅरिसने इटलीमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्टांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत कास्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या गॅरीसनने सुवर्ण पदक घेतले.
महिलांच्या ट्रॅप नेमबाजी प्रकारातील अंतिम फेरीत शबीराने 40 पैकी 29 शॉटस् नोंदवून तिसऱ्या स्थानासह कास्यपदक मिळविले. इटलीच्या सोफिया गोरीने 39 शॉटस् नोंदवित रौप्यपदक तर अमेरिकेच्या गॅरीसनने 40 पैकी 40 शॉटस् नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. कनिष्ट पुरूषांच्या ट्रॅप नेमबाजीत इटलीच्या रिकार्दो मिराबिलेने सुवर्ण, स्पेनच्या सॅलीचेसने कास्यपदक घेतले.









