तळेरे / वार्ताहर
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे, तालुका – कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये (STS) कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुलीच्या कुमारी- मुग्धा रामचंद्र देसाई या विद्यार्थिनीने ब्रॉंझ मेडल पटकावले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी व त्यांच्यातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने दुसरी ते सातवी या इयत्तांसाठी सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या परीक्षेसाठी कळसुली शिक्षण संघ, मुबंईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली प्रशालेतूनही बरेच विद्यार्थी प्रविष्ठ होत असतात. कुमारी – मुग्धा रामचंद्र देसाई हिच्या यशाबद्दल तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. ए. पी. पवार, मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे संस्था पदाधिकारी, शिक्षक-पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, माजी विद्यार्थी व समस्त पालक वर्गातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.









