वृत्तसंस्था / म्युनिच
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या इलावेनिल वलरिवनने कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत चीनच्या 18 वर्षीय वेंग झिफेईने 252.7 गुण घेत सुवर्णपदक मिळविले तर कोरियाच्या युनेजीने 252.6 गुणासह रौप्य पदक आणि भारताच्या 25 वर्षीय इलावेनिलने 231.2 गुणासह कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत रिले वन पात्रफेरीत भारताच्या निशांत रावतला 582 गुणासह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी पात्र फेरी प्रेसीशन स्टेजमध्ये भारताच्या इशा सिंगला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती मनु भाकर 290 गुणांसह 12 व्या स्थानावर राहिली.









