वृत्तसंस्था / लिऑन (स्पेन)
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या विश्व वेटलिफ्ंिटग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर लोगनाथन धनुषने 55 किलो वजन गटात कास्यपदक पटकाविले. या स्पर्धेच्या इतिसाहात पदक मिळविणारा धनुष हा भारताचा पहिला पुरूष वेटलिफ्टर आहे. पुरूषांच्या 55 किलो वजन गटात 17 वर्षीय धनुषने स्नॅचमध्ये 107 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 124 किलो असे एकूण 231 किलो वजन उचलत कास्यपदक घेतले. या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या पायलला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये भारताचे 9 सदस्यांचे पथक सहभागी झाले आहे.









