वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला पॅरा बॅडमिंटनपटू आरती पाटीलने बहरीन येथे झालेल्या विश्वचषक बॅडमिंटन फेडरेशनच्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. मध्यंतरी आरती पाटीलच्या पायाला दुखापत झाल्याने तिला काही दिवस क्रीडा क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते.
गेल्या फेब्dरुवारी महिन्यात थायलंडमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर आरती पाटीलने एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नव्हता. बहरिनमध्ये झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत एसयु-5 विभागात उपांत्य सामन्यात आरती पाटीलला भारताच्या मनिषा रामदासकडून पराभव पत्करावा लागल्याने तिला कांस्यपदक मिळाले.









