वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
2023 सालातील फिफाच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने झालेल्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत स्वीडनच्या महिला फुटबॉल संघाने सहयजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसऱ्या स्थानासह कास्यपदक पटकावले.
या स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवला गेला. 28 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर स्वीडनचे खाते फ्रिडोलिना रोल्फोने उघडले. 60 व्या मिनिटाला स्वीडनची कर्णधार अॅसलेनीने चेंडूवर ताबा मिळवत ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि तिने ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक अॅरनॉल्डला हुलकावणी स्वीडनचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत स्वीडन 1-0 असा आघाडीवर होता. या सामन्यात शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाला आपले खाते उघडता आले नाही. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य सामन्यात 3-1 तर स्पेनने स्वीडनचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.









