वृत्तसंस्था/ बँकॉक
अभिषेक पालने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते खोलले असून त्याने दहा हजार मीटर्स चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले.
अभिषेकने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 29 मिनिटे 33.26 सेकंदाचा अवधी घेतला. जपानच्या रेन ताझावाने (29:18.44) सुवर्ण, व कझाकस्तानच्या कोएच किमताय शाद्रॅकने (29:31.63) रौप्यपदक मिळविले. भारतीय सैन्यदलात काम करणाऱ्या 25 वर्षीय अभिषेकने शेवटच्या लॅपमध्ये जोरदार प्रयत्न करीत भारताला पहिले पदक मिळवून दिले. अनुभवी भालाफेकपटू अन्नू राणीचे पदक मात्र थोडक्यात हुकले. 59.10 मी. भालाफेक करीत चौथे स्थान मिळविले. महिलांच्या 1500 मी. शर्यतीत लिली दासचेही पदक हुकले. तिने 4.27 मि. वेळ नोंदवत सातवे स्थान मिळविले.









