वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनचा माजी टॉपसिडेड पुरुष टेनिसपटू काईल एडमंडने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपल्या वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्तीची घोषण केली आहे.
30 वर्षीय एडमंडने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एटीपी टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच 2018 साली त्याने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली होती. असा पराक्रम करणारा तो अॅन्डी मरेनंतरचा ब्रिटनचा दुसरा टेनिसपटू आहे. तब्बल 79 वर्षांनंतर डेव्हीस चषकावर नाव कोरणाऱ्या ब्रिटनच्या डेव्हिस चषक संघामध्ये एडमंडचा समावेश होता. तसेच त्याने 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधीत्व केले होते.









