लंडन :
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या उत्तर लंडन येथील घराला आग लागली. याप्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय इसमाला अटक केली आहे. पंतप्रधानांच्या मालमत्तेशी या इसमाचे कनेक्शन असल्याचे समजते. या घराला आग लावत अनेकांचा जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी या इसमाला अटक करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पदभार स्वीकारल्यावर स्टार्मर हे पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान डाउनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत. तसेच स्वत:चे कौटुंबिक घर त्यांनी भाडेतत्वावर दिले आहे.









