प्रिन्स विल्यम्स यांच्यासमोरच तीन सैनिक बेशुद्ध
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्स विल्यम्स यांच्या वाढदिवसानिमित्त परेडची तयारी करत असताना रॉयल गार्ड्सचे तीन सैनिक बेशुद्ध झाले. लंडनच्या सुमारे 30 डिग्री सेल्सिअसच्या उष्णतेमध्ये सैनिकांनी लोकरीचा गणवेश आणि अस्वलाच्या कातडीच्या टोप्या परिधान केल्या होत्या. या वेशभूषेमुळे कवायत सुरू असताना काही सैनिक बेशुद्ध होऊन खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले असून वाढत्या उष्माघातामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन ब्रिटनवासियांना करण्यात आले आहे. ब्रिटन हेल्थ सिक्मयुरिटी एजन्सीने दक्षिण इंग्लंडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
ब्रिटनमध्ये यावषी प्रथमच तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशा स्थितीत परेडच्या तयारीत असलेले तीन सैनिक अचानक एकापाठोपाठ एक जमिनीवर कोसळले. जवान बेशुद्ध पडले तेव्हा प्रिन्स विल्यमही तेथे उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये जवान जमिनीवर पडलेला दिसत आहे. मात्र, असे असतानाही तालीम सुरूच होती. एक सैनिक जमिनीवर कोसळल्यानंतर बाहेरील काही सैनिक वैद्यकीय मदतीसाठी जवानाकडे धावत येऊन त्याला उचलून नेताना दिसत आहेत. प्रिन्स चार्ल्स यांचा अधिकृत वाढदिवस साजरा करण्यासाठी दरवषी जूनमध्ये वार्षिक लष्करी परेड आयोजित केली जाते.









