ब्रिटिश इंजिनियर्सची टीम करतेय दुरुस्ती
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
मागील 27 दिवसांपासून केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडलेले ब्रिटनचे एफ-35बी लढाऊ विमान पुढील आठवड्यात ब्रिटनला परत जाऊ शकते. पुढील आठवड्यापर्यंत याची दुरुस्ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश इंजिनियर्सची एक टीम हायड्रॉलिक बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांमध्ये विमान उ•ाण करण्यास सक्षम होईल अशी माहिती एका भारतीय अधिकाऱ्याने दिली आहे.
केरळमध्ये अडकून पडलेले हे ब्रिटनचे लढाऊ विमान पाचव्या पिढीचे आहे. याची किंमत 115 दशलक्ष डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. 14 जूनपासून हे विमान केरळमधील विमानतळावर उभे आहे. खराब हवामान आणि कमी इंधनामुळे हे विमान केरळमध्ये अडकून पडल्याचे प्रारंभी बोलले गेले होते. या विमानाने विमानवाहू युद्धनौका एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्समधून अरबी समुद्राच्या वर युद्धाभ्यासासाठी उ•ाण केले होते. परंतु याचे केरळमध्ये आपत्कालीन अवतरण करावे लागले.
लढाऊ विमान अनेक दिवसांपर्यंत दुरुस्त न झाल्याने अनेक दावे केले जाऊ लागले होते. केरळच्या पर्यटन विभागाने देखील यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. एका एआय जनरेटेड पोस्टमध्ये विमान केरळच्या भूमीवर दाखविण्यात आले होते आणि ‘केरळ एक आकर्षक ठिकाण असून येथून मी जाऊ इच्छित नाही’ अशी मजेशीर कॅप्शन देण्यात आली होती.
हँगरमध्ये नेण्यात आले
प्रारंभी लढाऊ विमानाला विमानतळाच्या बे 4 वर उभे करण्यात आले होते, सीआयएसएफ जवान या विमानावर नजर ठेवून होते. परंतु अनेक आठवड्यांपर्यंत पावसात उभे राहिल्यावर 6 जुलै रोजी ब्रिटनचे हे विमान हँगरमध्ये नेण्यात आले. याचदरम्यान ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे तज्ञ एअरबस ए400एम अॅटलस विमानाने केरळमध्ये दाखल झाले होते.
हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड
लँडिंगनंतर विमानाच्या हायड्रोलिक सिस्टीमध्ये बिघाड झाला होता, यामुळे लँडिंग गियर, ब्रेक आणि कंट्रोल सरफेल यासारखे महत्त्वपूर्ण हिस्से प्रभावित झाले होते. कॅरियर स्ट्राइक ग्रूप आणि आरएएफ टीमच्या तंत्रज्ञांनी हा बिघाड दूर करण्याचा जोरदार प्रयत्न केला, परंतु यात अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला आहे.









