भारतीय खाद्यपदार्थ आवडल्याने घेतला निर्णय
लोक अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर स्वतःच्या मुलांची नावे ठेवत असतात. परंतु ब्रिटनमधील एका जोडप्योन स्वतःच्या मुलाचे नाव भारतीय खाद्यपदार्थावर आधारित ठेवले आहे. भारतीय लोक या खाद्यपदार्थाचा आनंद चहासोबत घेत असतात. आयर्लंडच्या न्यूटाउनबेबीमध्ये राहणाऱया या जोडप्याने स्वतःच्या मुलाचे नाव ‘पकोडा’ ठेवले आहे.
द कॅप्टन्स टेबल नावाच्या रेस्टॉरंटने सोशल मीडियावर याची माहिती दिली ओ. हे जोडपे या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी पोहोचले होते. मेन्यू कार्डमध्ये भारतीय खाद्यपदार्थ देखील होते. त्यांनी पकोडा ऑर्डर केला होता. त्यांना हा पकोडा इतका आवडला की त्यांनी स्वतःच्या नवजात मुलाला ‘पकोडा’ हेच नाव दिले आहे.

सोशल मीडियावर या घटनेवर लोक मजेशीर कॉमेंट्स देत आहेत. एका युजरने छायाचित्र शेअर करत ‘याच्या आजीचे नाव ‘नान’ असेल असे नमूद पेले आहे. तर दुसऱया युजरने ‘मला दोन मुले असून त्यांची नावे चिकन अन् टिक्का आहेत अशी कॉमेंट केली आहे. या जोडप्याच्या पुढील मुलाचे नाव समोसा असेल असे एकाने म्हटले आहे.
रेस्टॉरंटने मुलाच्या छायाचित्रासोबत ऑर्डरचे बिलही सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘वेलकम टू द वर्ल्ड पकोडा’ असे रेस्टॉरंटने नमूद केले आहे. अनेक लोकांनी याला ट्विटरवर शेअर केले आहे. या ट्विटला आतापर्यंत 26 हजारांहुन अधिक लोकांनी लाइक केले आहे. 1500 हून अधिक जणांनी याला रिट्विट केले आहे.









