मुंबई
बिस्कीटसह इतर उत्पादनांमध्ये असणाऱया ब्रिटानिया इंडस्ट्रिजचा समभाग सोमवारी शेअर बाजारात दमदार वधारला होता. कंपनीचा समभाग सोमवारी बीएसईवर 10 टक्के वाढत 4181 रुपयांवर पोहचला होता. अशारितीने समभागाचा भाव उच्चांकी स्तरावर पोहचला होता. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने महसुलात चांगली वाढ दर्शवल्याच्या कारणास्तव समभाग वधारताना दिसला. याचबरोबर कंपनीचे बाजार मूल्य 1 ट्रिलीयनवर पोहचले आहे.









