शशीकुमार-विष्णूवर्धन दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था/ म्हैसूर
रविवारी येथे झालेल्या आयटीएफ म्हैसूर खुल्या 2023 च्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद ब्रिटनच्या जॉर्ज लोफेहॅगेनने पटकावले. अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या इलिस ब्लेकचा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या मुकुंद शशीकुमार आणि विष्णूवर्धन यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लोफेहॅगेनने ऑस्ट्रेलियाच्या इलिस ब्लेकचा 4-6, 6-2, 7-6 (7-4) असा पराभव केला. हा सामना जवळपास तीन तास चालला होता. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या मुकुंद शशीकुमार आणि विष्णूवर्धन यांनी टॉप सिडेड जोडी त्रिुत्विक चौधरी आणि निकी पुनाचा यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला. हा सामना 70 मिनिटे चालला होता. कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव महेश्वर राव तसेच म्हैसूरचे उपजिल्हाधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना चषक व रोखरकमेची बक्षीसे देण्यात आली.









