वृत्तसंस्था/ सेऊल
एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या कोरिया खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मंगळवारी एकेरीच्या पहिल्या फेरीत ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचे आव्हान जपानच्या निशीओकाने संपुष्टात आणले.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामन्यात 25 व्या मानांकित निशीओकाने इव्हान्सचा 6-2, 7-6 (7-5) अशा सेटसमध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना सुमारे 100 मिनिटे चालला होता. निशीओकाने यापूर्वी 4 सामन्यामध्ये इव्हान्सला पराभूत केले होते.









