प्रमोद नाईक यांचे आवाहन
मडगाव : भाऊसाहेबाचे स्फूर्तीदायी कार्य भावी पिढी समोर आणायला पाहिजे असे कुडचडेचे युवा नगरसेवक प्रमोद उर्फ भाई दा. नाईक यांनी दयानंद कला केंद्राने कार्यालयात 112 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नात्याने बोलून दाखविले. गोवा पर्यटन महामंडळाचे माजी संचालक व समाजसेवक केशव नाईक यावेळी म्हणाले भाऊ साहेबाच्या शिक्षण प्रचारक योजनामुळेच आज आम्ही ताठ मानेने बोलू शकतो, त्यांनी जर खेड्यापाड्यातून दारोदारी मराठी प्राथमिक शाळा उघडल्या नसत्या तर आज आम्हाला गोव्याचा व देशाचा इतिहास समजणे कठीण झाले असते. अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी एक योगा योगाची गेष्ट सांगितली यंदा भाऊसाहेबाची 50 वी पुण्यतिथी आहे आणि भाऊनी पहिल्या मंत्रिमंडळात सांगे – केपे तालुक्यांना एकाचवेळी प्रतिनिधित्व दिले होते आता पन्नास 50 वर्षानंतर परत एकदा डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे – कुडचडेला मंत्रीमंडळात मा.निलेश काब्राल व मा. सुभाष फळदेसाई यांना स्थान देऊन भाऊच्या विचाराना पृष्टी दिली व हे दोन्हीमंत्रीगण दयानंद कला केंद्राच्या पाठिशी उभे राहून कार्यक्रमाना मदत करीत असतात. यावेळी भाऊचे निष्ठावंत कैर्यकर्ते लक्ष्मण भाऊ मडगावकर यानीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास उपाध्यक्ष अशोक नाईक, गायक कलाकार जयकुमार खांडेकर, सचीव गोविंद गावडे, मोहनदास गावस देसाई, सदगुरू म्हापसेकर, ज्ञानेश्वर नाईक इत्यादींनी पुष्पांजली वाहून आदरांजली दिली. अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी आपल्या आभार प्रदर्शनपर भाषणात पुण्यतिथी वर्ष ह्या केंद्रासाठी एक उत्सवी असे वर्ष असून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सदस्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कोषाध्यक्ष नवीन खांडेकर, भिकू नाईक, सदानंद खांडेकर, राया देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास बरेच परिश्रम घेतले.









