बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व मराठी विद्यानिकेतन स्कूल आयोजित फुलबाग गल्ली, चव्हाट गल्ली, सदाशिवनगर, कॅम्प व गणपत गल्ली क्लस्टर प्राथमिक विभागीय क्रीडा स्पर्धाना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मराठी विद्यानिकेतन मैदानावर आयोजित या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, शहर क्रीडा अधिकारी जे. बी. पटेल, प्रा. सुरेश पाटील, मुख्याध्यापक बी. जी. पाटील, एन. सी. उडकेकर, शिक्षण समन्वयक नीलू आपटे, सविता पवार, कॅम्प विभागीय क्रीडा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एन. जी. भगवंतण्णवर, क्रीडाशिक्षक दत्ता पाटील, महेश हागीदाळे, श्रीधर बेन्नाळकर, वैभवी दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते असे क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक विभागातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. शालेय क्रीडा स्पर्धेत चमक दाखवलेल्या स्नेहा हिरोजी, वैष्णवी कोवाडकर, साक्षी पाटील, रितेश मुचंडीकर, सरिता पाटील या विद्यार्थ्यांनी मैदानाभोवती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. क्रीडाज्योत उंचावून पाहुण्यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले. राज्यस्तरीय खेळाडू ऐश्वर्या कंग्राळकरने सर्व खेळाडूंना शपथ दिली. या क्रीडा स्पर्धेत फुलबाग गल्ली, चव्हाट गल्ली, सदाशिवनगर, पॅम्प, गणपत गल्ली येथील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.









