Brilliant performance of Owley’s son in the Football World Cup
रोशन सावंतची जर्मनीतील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
दाणोली नजिक ओवळीये गावाचा सुपुत्र रोशन सावंत याने मलेशियात झालेल्या सोका विश्वचषक फुटबॉल स्पर्धत भारतीय संघातून चमकदार कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे त्याची आता जर्मनीत होणाऱ्या २३ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल क्रिकेट स्पर्धेसाठीही भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय संघातील कामगिरीच्या आधारे रोशनची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली होती. मलेशियातील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रोशन सावंतने पहिल्या सामन्यात अवघ्या पंधराव्या मिनिटाला भारतीय संघासाठी गोल केला. त्यामुळे जर्मन संघाचा ३-२ ने पराभव झाला. स्पेनविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोशनने एक गोल आणि एक असिस्ट केला. मात्र स्पेनने भारतीय संघाचा ६-३ असा पराभव केला.
या विश्वचषक स्पर्धेतील रोशन सावंतची चांगली कामगिरी पाहून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने त्याची लवकरच होणाऱ्या जर्मनीतील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघाला नंतर हिरो आयलीगमध्ये खेळण्याचा मान मिळणार आहे. रोशन याची यापूर्वी हरियाणा मिनी फुटबॉल असोसिएशन तर्फे राष्ट्रीय फुटबॉल क्लब संघात निवड झाली होती. रोशन सावंतने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अल्पावधीत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
ओटवणे प्रतिनिधी









