मालवण / प्रतिनिधी
श्री.राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी यांनी दि.१९ आणि २० ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केलेल्या खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत पृथा पर्रिकर (गोवा) ने एकेरी आणि गौतम वाडकर (सावंतवाडी)च्या साथीने दुहेरीमध्येही विजेतेपद मिळवून आपल्या शिरपेचात दुहेरी मुकुट खोवला. दुहेरीमध्ये इशांत वेंगुर्लेकर (मालवण)याने बसाक मॅडम यांच्या साथीने दुहेरीचे उपविजेतेपद मिळविले.ही स्पर्धा १५वर्षाखालील मुले/मुली आणि खुल्या गटामध्ये पुरुष आणि महिला एकत्र अशी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये घेण्यात आली.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे
१५वर्षाखालील मुली-
प्रथम आरोही चांदे (कोल्हापूर),
द्वितीय माही सावंत (रत्नागिरी).
१५ वर्षाखालील मुले-
प्रथम सर्वेश पाटील (कोल्हापूर),
द्वितीय सोहम खोत (कोल्हापूर).
एकेरी खुला गट-
प्रथम पृथा पर्रिकर (गोवा),
द्वितीय मनिष पिंगे (कोल्हापूर).
दुहेरी खुला गट-
प्रथम पृथा पर्रिकर (गोवा)आणि गौतम वाडकर (सावंतवाडी).
द्वितीय बसाक मॅडम (कोल्हापूर) आणि इशांत वेंगुर्लेकर (मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर जाऊन टेबल टेनिस खेळामध्ये अभूतपूर्व यश संपादन केल्याबद्दल महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर आणि सचिव हेमंत वालकर यांनी ईशांत वेंगुर्लेकर आणि गौतम वाडकर यांचे अभिनंदन केले आहे.









