वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघात दुखापतग्रस्त गुरुजपनीत सिंगच्या जागी द. आफ्रिकेचा अष्टपैलु डिवेल्ड ब्रेव्हीसला बदली खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे.
आयपीएलच्या फ्रांचायझीनी ही माहिती शुक्रवारी दिली असून ब्रेव्हीस हा द. आफ्रिकेचा आक्रमक अष्टपैलु म्हणून ओळखला जातो. 2023 साली ब्रेव्हीसने टी-20 प्रकारात आपले पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत दोन सामने द. आफ्रिकेकडून खेळले आहेत. 2022 आणि 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ब्रेव्हीस हा मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. त्याने आतापर्यंत 10 सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत. ब्रेव्हीसने 81 टी-20 सामन्यात 1787 धावा जमविल्या असून 162 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. चेन्नईने ब्रेव्हीसला 2.2 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे.









